करुणा यांचा धनंजय मुंडेवर खळबळजनक आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ फेब्रुवारी २०२३ । राज्यात गेल्या काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्यानंतर ते परळीत गेल्याने समर्थकांनी मोठ्या जोशात त्यांचे स्वागत केल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांनी खळबळजनक आरोप केले आहे.

आ.धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. धनंजय मुंडे यांचे किती मुलींसोबत संबंध आहे, याचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे. 2 दिवसांपूर्वी देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला बीडमध्ये निवडणुकीत हरवून दाखवा, असे आव्हान करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या किंवा मुलांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता त्यांनी आणखी खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय मुंडेने आजपर्यंत मला फसवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पोलिसांच्या समोर गाडीत रिवॉल्वर ठेवले. माझ्या मुलांना सहा महिने दूर ठेवले. माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले. सहा खोट्या केसेस केल्या. षड़यंत्र रचण्यासाठी वेगवेगळे लोक पाठवून माझी आर्थिक फसवणूक केली. तरीपण मी हारली नाही. आणि त्यांच्यासोबत लढत आहे.

आता एक नवीन षड्यंत्र चालू केले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर माझे खोटे बनावटी व्हिडीओ व्हायरल केले आणि आता रोज-रोज मला धमक्या, मानसिक त्रास देत आहे, तरी मी माझ्या स्वखर्चाने धनंजय मुंडेची आणि माझी नार्को टेस्ट पब्लिकसमोर करण्याची विनंती करत आहे. धनंजय मुंडेचे किती आणि माझे किती खरे आहे ते दूध-का दुध आणि पाणी का पाणी होईल. आणि मी ज्या-ज्या मुलींची नावे सांगेन त्या मुलींसोबत धनंजय मुंडेंचे काय संबंध आहेत त्याचा पण पर्दाफाश होईल आणि या सगळ्या गोष्टींची कम्पलेट्स DGP,CM, आणि महिला आयोगाकडे आहेत.

परंतु आतापर्यंत त्यावर एकही कार्यवाही झाली नाही. रुपाली चाकणकरने आतापर्यंत धनंजय मुंडेंवरती कार्यवाही केली नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोग दिल्लीकडे रुपाली चाकणकरला पदावरून हटवण्याची मागणी करून आली आहे. माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की धनंजय मुंडेंवरती गुन्हा दाखल व्हावा आणि रुपाली चाकणकरला पदावरून काढून सक्षम महिला आयोग अध्यक्ष बनवावे अन्यथा मी आमरण उपोषणासाठी मंत्रालयासमोर बसणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम