दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | ठाणे | राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान,आधुनिक भारत परिवार, पँथर रिपब्लिकन बहुजन संसद, संविधान सन्मान अभियान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) यांच्या संयुक्त विद्यमाणे आंबेडकरी युनायटेड अलायन्स यांच्या वतीने अध्यक्ष कर्मवीर सुनिल खांबे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३,१४ आणि १५ एप्रिल २०२४ रोजी तीन दिवसीय कार्यक्रम कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसर येथे उत्साहात साजरे होणार आहेत. बाबासाहेबांचा हा उत्सव मनोरंजन व मार्गदर्शन माध्यमातून आंबेडकरी विचार मंचावरुन सांस्कृतिक कार्यक्रम फराळाचे वाटप ,फटाक्यांची आतीषबाजी व ढोल ताशे अशा विद्युत रोषणाईउत्साहपूर्वक वातावरणात संपन्न होणार आहे.
१४ एप्रिल २०२४ जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी व अखंड भारताला शुभेच्छा देण्यासाठी सालाबादपमाणे शनिवार १३ एप्रिल रात्री आंबेडकरी अनुयायी म्हणून येणार आहात आणि सर्व जातीचे, धर्माचे, वर्णाचे लिंगाचे, भाषेचे, पंताचे प्रांताचे, हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौध्द, जैन, पारशी, यहुदी सर्वधर्मीय, सर्वराजकीय पक्ष एकत्र येऊन संविधानात्मक लोकशाही प्रमाणे भारतीय म्हणून आपण आपले स्वतंत्र हक्काचे आंबेडकरी विचारपीट असे समजून कार्यकमात सहभागी व्हा आणि मोठ्या प्रमाणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमउत्सव साजरा करूया असे आवाहन सुनील खांबे यांनी केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम