चेहऱ्यावर चुकुनही वापरू नका या क्रीम्स !
दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । हिवाळ्यासह उन्हाळ्यात आपण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या त्वचेची काळजी घेत असतो, नेहमी वेगवेगळे क्रीम लावून त्वचा कशी नाजूक राहील यासाठी प्रयत्न करीत असतो. कधी चेहरा बरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो अथवा ब्युटी ट्रीटमेंट केले जाते, तर कधी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा वापर केला जातो. पण अनेक क्रिम्समुळे आपल्या त्वचेवर नकळतपणे जळजळ होऊ लागते आणि रॅशेसही येऊ शकतात. अशा वेळी त्वचा खूप लाल होते किंवा काही वेळा रिॲक्शनमुळे जखमाही होतात.
जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा अनेक गोष्टी त्वचेवर लावतो ज्या लावणे योग्य नसते. त्वचारोगतज्ञ कधी-कधी आपल्याला अशा क्रीम्स लिहून देतात ज्या विशिष्ट समस्येसाठी असतात, परंतु समस्या संपल्यानंतरही लोक त्याचा वापर करत असतात. हे घातक ठरू शकते. त्वचेसाठी कोणती क्रीनम्स वापरू नयेत हे जाणून घेऊया.
टॉपिकल स्टिरॉइड्स
आपण विचार न करता मोमेटासोन, फ्लुटिकासोन, बीटामेथासोन अशी अनेक क्रीम लावतो. त्यामुळे आपली त्वचा इतकी खराब होऊ शकते की त्वचेवर काळे डाग पडू शकतात. बहुतेक लोक या क्रीम्सचा वापर गडद स्पॉट्स कमी करण्यासाठी करतात, परंतु त्याचा उसलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टॉपिकल स्टिरॉइडपासून दूर रहावे आणि डर्मिटॉलॉजिस्टनी ते लिहून दिले तरच वापर करावा.
स्टिरॉइड क्रीम
Betnovate-N सारखी अनेक स्टिरॉइड क्रीम्स आहेत ज्याचा वापर लोकं गोरं होण्यासाठी किंवा मुरुम कमी करण्यासाठी करतात. त्याचा लगेच प्रभाव तर दिसतो पण त्यामुळे मुरमं अजून खराब होऊ शकतात. या क्रीम्सचा बराच काळ वापर केल्यास त्वचा पातळ होऊ शकते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या अधिक दिसतात. यासोबतच चेहऱ्यावरील केसही अधिक वाढू शकतात.
ही क्रीम्स कधी वापरावीत ?
ही क्रीम्स नेहमी डॉक्टरांनी सांगितल्यावरच वापरावीत. एक्जिमा, त्वचारोग, सोरायसिस यांसारख्या अनेक समस्यांसाठी ही क्रीम्स लिहून दिलेली असतात, पण त्याचा वापर फार कमी काळासाठी करायचा असतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम