चुकुनही ओव्हनमध्ये हे पदार्थ करू नका गरम !
दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ । तुम्हाला जर नेहमी गरम खाण्याची सवय असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: घर असो वा ऑफिस प्रत्येकाला गरम जेवण हवे असते. अन्न गरम करण्यासाठी ओव्हनचा वापर केला जातो. ज्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजकाल बरेच लोक आपल्या सोयीसाठी ओव्हनचा वापर करतात. ओव्हनमधील अन्न खूप लवकर गरम होते. पण तज्ज्ञांच्या मते, अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये. नेहमी ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करावा. अन्न वारंवार गरम केल्याने त्यात बॅक्टेरियाची संख्या वाढू लागते. त्यामुळे अन्न विषारी बनते आणि ओव्हनचा वापर केल्याने धोका वाढतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावं सांगणार आहोत. जे तुम्ही चुकूनही ओव्हनमध्ये गरम करू नये.
तांदूळ : तांदूळ ओव्हनमध्ये गरम करू नये. भात लवकर थंड होतो आणि ओव्हनमध्ये तांदूळ गरम केल्याने त्याची चवही कमी होते. ही चव टिकवण्यासाठी भात अनेकदा ओव्हनमध्ये गरम केला जातो. परंतु, यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.
बटाटा : जर तुम्ही बटाट्याची भाजी ओव्हनमध्ये पुन्हा गरम करण्याची सवय असेल तर वेळीच थांबा. बटाट्यातील उष्ण वातावरणामुळे बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्यामुळे तुम्ही फूड पॉयझनिंगचाही बळी होऊ शकता.
अंडी : जर तुम्हाला अंडी खायची आवड असेल आणि तुम्हाला थंड अंडी आवडत नसतील. अशा वेळी अनेकदा अंडी पुन्हा गरम केली जातात. मात्र, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ओव्हनमध्ये अंडी गरम केल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि तुमचे पोट खराब होऊ शकते.
चिकन : जर तुम्हालाही चिकन खाण्याची आवड असेल तर हे लक्षात घ्या की चिकन ओव्हनमध्ये गरम करू नका. बरेच लोक मोठ्या प्रमाणात चिकन बनवतात आणि ते रात्रभर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि दिवसा पुन्हा गरम करतात. रिपोर्ट्सनुसार, असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. गरमागरम चिकन खाण्याच्या आवडीमुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चिकन गरम केल्याने त्यातील प्रोटीन विषारी बनते. ज्यामुळे तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. जर तुम्हाला चिकन फेकायचे नसेल तर तुम्ही ते मंद आचेवर गरम करू शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम