तुम्ही या फळाची सालचे सेवन केल्यास होणार आरोग्यास फायदा !
दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ । आपण नेहमी फळांच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न्न्न करीत असतो, संत्री हे फळ अनेकांना आवडते. संत्र्यांचा ज्युस पिऊन अनेक लोक दिवसाची सुरुवात करतात. संत्री हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक संत्री खाल्यानंतर त्याचे साल फेकून देतात.पण संत्रीचे साल न फेकता तुम्ही त्याचा वापर करु शकता. संत्रीप्रमाणेच संत्रीचे साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊयात संत्रीच्या
सालाचे फायदे
संत्रीच्या सालामध्ये असतात पोषक तत्वे
फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते. संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते. तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर तयार करुन त्या पावडरमध्ये मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. हे मिश्रण पील ऑफ मास्कसारखे असते. संत्रीच्या सालांपासून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यानं कोंडा होत नाही.
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवत असतील तर संत्रीचे साल खा. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात. संत्रीच्या सालाची पावडर तयार करुन ती गरम पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी प्या. संत्रीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. संत्र्याच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे उत्तम आहे. जर तुम्हाला दात किंवा हिरड्यांशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही संत्र्याचे साल कच्चे खाऊ शकता.
असे करा सेवन
तुम्ही संत्रीचे साल चावून खाऊ शकता. जर हे साल चावून खात असताना, या सालीची चव तुम्हाला कडू लागत असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा संत्रीच्या सालाची पावडर आणि मध मिक्स करुन पिऊ शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम