केळी खाल्यानंतर साल फेकू नका ! का आहे फायदेशीर ?
दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ । आपल्या आरोग्यासाठी नेहमी केळी खाणे चांगले मानले जाते. केळी खाल्ल्यानंतर शक्यतो आपण त्याची साल फेकून देतो. परंतु, या सालीचे फायदे माहित नसल्यामुळेच आपण असे करतो. परंतु, केळीचे फायदे वाचल्यानंतर या पुढे केळीची साल फेकून देण्यापूर्वी तुम्ही 100 वेळा विचार कराल. केळीची साल आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषत: त्वचेला याचे अनेक फायदे आहेत. केळ्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन B6, B12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया केळीच्या सालीचे कोणते फायदे आहेत.
चामखीळांपासून मुक्ती – एका संशोधनात असे समोर आले आहे की, केळीच्या सालीमध्ये असलेले काही विशेष घटक चामखीळांपासून मुक्त होण्यास मदत करतात. चामखीळांपासून सुटका मिळवण्यासाठी केळीच्या सालीचा थोडासा भाग रात्रभर चामखीळावर रोज लावा. असे काही दिवस केल्याने हळूहळू चामखीळ निघून जाईल.
मुरुम होतो कमी
केळीच्या सालीमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ते मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा नाश करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतो. केळ्याची साल बारीक करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साली थेट त्वचेवर घासूनही वापरू शकता.
सुरकुत्या कमी होतात.
केळीच्या साली सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेतील कोलेजन वाढवतात आणि आर्द्रता लॉक करण्याचे काम करतात. रोज चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते
केळीची साल त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्यासही मदत करते. केळीच्या सालीमध्ये फेनोलिक कंपाऊंड जास्त प्रमाणात आढळते जे त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते.
दातांसाठी फायदेशीर
जर तुमचे दात पिवळे झाले असतील तर केळीची साल दातांवर रोज चोळल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज आढळतात ज्यामुळे दात चमकदार होतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम