तुमच्या मानेला असतील असे डाग तर करा हे उपाय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  आपण नेहमी सुंदर दिसण्यासाठी अनेक घरगुती उपाय करीत असतो, अनेक वेळा याच उपायाने समस्या सुटत असतात. जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा चांगली असेल पण मान काळवंडलेली असेल, त्यावर डाग असतील त्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण होऊ शकते. काहीवेळा त्वचेची चांगली काळजी न घेतल्याने ही समस्या उद्भवते, तर कधी खराब आरोग्य किंवा औषधांच्या सेवनामुळे हा त्रास होऊ शकतो. सूर्यप्रकाश, प्रदूषण इत्यादींमुळे त्वचेवर गडद ठिपके तयार होतात. त्वचेची काळजी न घेतल्याने किंवा सूर्यप्रकाश इत्यादींमुळे जर तुमची मान काळी झाली असेल तर तुम्ही साध्या घरगुती उपायांच्या मदतीने काळ्या मानेची समस्या दूर करू शकता. कसे ते जाणून घेऊया.
मानेच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

बटाटा
बटाट्यामध्ये त्वचा उजळणारे नैसर्गिक तत्व आढळते, ज्याच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा सहज दूर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही उन्हामुळे काळी झालेली मान देखील स्वच्छ करू शकता. यासाठी बटाट्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस टाकून मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा धुवा. फरक दिसून येईल.

ओट्स
ओट्समध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. हे त्वचा स्वच्छ करण्यास, तसेच त्वचेला पोषण देण्यास व ती मऊ करण्यास मदत करते. दोन चमचे ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून त्यात टोमॅटोचा रस घाला. आता ते त्वचेवर लावा. हळूहळू तुमची त्वचा स्वच्छ होईल.

संत्र्याचे साल
संत्र्याच्या सालीमध्ये त्वचा उजळवण्याचे गुणधर्म देखील असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. संत्र्याची साल दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता ते मानेवर नीट लावा. 15 मिनिटांनंतर तुम्ही ते धुवा. त्वचा स्वच्छ होण्यास सुरवात होईल.

कोरफड
कोरफडीच्या मदतीने तुम्ही काळी मान नीट स्वच्छ करू शकता. त्यात एलोइन डिपिग्मेंटिंग आढळते ज्यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. कोरफडीचे पान घेऊन त्यातील गर घ्या काढून घ्या. हा ताजा रस मानेवर लावा, आणि 15 मिनिटांनंतर ते धुवा. किंवा तुम्ही ते जेल त्वचेवर रात्रभर ठेवू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम