ठाकरे भावी मुख्यमंत्री तर मी भावी पंतप्रधान ; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  राज्यात सर्वच पक्षात नेहमी बॅनरबाजीची चर्चा रंगत असते. हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झाले हि असे काही आज गुढीपाडव्यानिमित्त राजकीय पक्षांचे शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखई मुंबईत बॅनर लावले आहेत. आज शिवतीर्थवर मनसेचा मेळावा देखील आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सेना भवनसमोर हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी डिवचले आहे.

“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे” या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आज मनेसाचा गुढीपाडवा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे भाषणातून उद्धव ठाकरे यांचा समाचार घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री उल्लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका माध्यमाशी बोलतांना सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज ठाकरे भावी मुख्यमंत्री आहेत असं त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम