रात्री फ्रीज बंद केल्यावर खरच वीज बचत होतेय का? जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । नेहमीच काही लोकांना असे वाटते कि, रात्रीच्यावेळी फ्रीज बंद आपण वापरात नसतो पण वीज बिल त्याचे पण येवू शकते, त्यामुळे ते बंद करून देतात पण ज्याप्रमाणे झोपताना सर्व दिवे बंद केले जातात, त्याप्रमाणे फ्रीज पण बंद करून झोपावं. रात्री फ्रिज आपण चालू ठेवतो तर काहींना असा समज आहे कि फ्रिज हे रात्र भर चालू असतं. बंद केले तर विजेची बचत होते.

BJP add

फ्रिज मध्ये थर्मोस्टेट नावाचा part असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हा part टेम्प्रेचर मेन्टेन ठेवतो. उदा. जर आपण रात्री फ्रिज हे 10 तास चालविल तर 10 मधल्या 5 तासच चालू असच, कारण फ्रिज मध्ये कूलिंग मेंटेन झाली की, फ्रिज बंद होते.

दिवसा फ्रीज जास्त वेळा उघड बंद होतो, सतत आपण वस्तु, पदार्थ किंवा पाणी आत ठेवत काढत असतो. तेव्हा आतली गार हवा बाहेर पडून बाहेरील गरम हवा फ्रिज मध्ये शिरत असते.
थर्मोस्टॅट तापमानातील बदल लगेच ओळखतो आणि फ्रीज परत आतुन ठरलेल्या तापमानास आणण्यासाठी कॉम्प्रेसर चालू करतो. फ्रीजचं तापमान एकदा ठरवलेल्या तापमानास आलं की हाच थर्मोस्टॅट परत कॉम्प्रेसर बंद करवतो. दिवसा आपला वापर आणि बाहेरील तापमान गरम असल्याने हे कार्य सतत चालू असते व कॉम्प्रेसर जवळपास ६०% वेळेस चालूच असतो.
याउलट, रात्री फ्रीज चा वापर, उघड बंद करण, नवीन पदार्थ काढणं ठेवण हे सगळेच बंद असते. तसेच बाहेरील तापमानही दिवसा पेक्षा गार असते. पर्यायाने फ्रीजच्या आतील गार तापमानात फार चढ उतार येत नाहीत.त्यामुळेच रात्री थर्मोस्टॅट ला तापमानातील चढ उतार जास्त न जाणवून जास्ती करून कॉम्प्रेसर बंद अवस्थेतच राहतो. दिवसभराच्या तुलनेत रात्रभरात फक्त २०% वेळच कॉम्प्रेसर चालतो. त्यामुळेच वीज बचत आपोआपच होते, आपण बंद करण्याची गरजच नसते.

अन्नाला आणि विशेषतः पाण्याला एक विचित्र शेवाळ्यासारखी चव/वास येतो.

रात्रीत फ्रीजच्या आतील तापमान जास्त गरम झाल्यामुळे सकाळी आपण चालु केल्यावर कॉम्प्रेसरला जास्त ताकदीने जास्त वेळ काम करून फ्रीज परत ठराविक तापमानावर आणावा लागतो.

यासाठी लागणारी वीज रात्री बंद ठेवून वाचवलेल्या वीजेपेक्षा जास्त असते.

बर्फ रोज रात्रीत वितळतो व परत घट्ट होतो व त्याला एक स्टेल, शिळा असा वास येवू लागतो. हेच बटर, दुध, भाज्यांच्या बाबतीतही होते.

फ्रीज फक्त गार करायचं काम करत नाही तर तो आतील दमटपणा सुध्दा नियंत्रीत करतो. फ्रीज बंद केल्यावर आतील दमटपणा वाढून भाज्या व पदार्थ लवकर खराब व्हायची शक्यता वाढते.

गावी जायचे असले तरी फ्रीज चालुच ठेवून जावे. किती ऑप्टीमल तापमान पाहिजे तेवढं सेट करावं. फ्रीज इमानदारीत काम करत राहतो जास्तीची वीज न खाता.

नवीन फ्रीज डिजीटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेले असतात वर स्टार रेटींग चांगलं असेल तर वीज फारच कमी वापरतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम