
तुमची नेलपॉलिश दोन मिनिटात सुकत नाही का? ‘हे’ करून पहा
दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । प्रत्येक स्त्रीसाठी नेलपॉलिश हा विषय आवडता असतो, त्यातच त्याचे किती प्रकार हे फक्त एका महिलेलाच माहिती असू शकते, त्यासोबत कोणत्या नेलपॉलिशने त्रास होवू शकतो किवा कोणता रंग कधी लावायचा असतो, हे फक्त आणि फक्त महिलाच सांगू शकते,
सणसमारंभ असो किंवा अगदी रोज ऑफिस, कॉलेजला जाताना नेलपॉलिश लावणं असो, पण त्याविषयी एक वेगळं आकर्षण महिलांमध्ये नक्कीच जाणंवतं.अगदी दोन मिनीटांत नेलपॉलिश नखांवर लावली जात असली तरी ती सुकणं हा मोठा वेळखाऊ भाग असतो. जर चुकून ओल्या नेलपॉलिशवर काही लागलं किंवा तो हात कशावर लागला तर सगळी मेहनत पाण्यात जाते आणि नेलपॉलिश खराब होते. या त्रासापासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
वॅसलिनचा वापर करा
नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखाभोवती व्हॅसलीन लावा. यामुळे नेलपॉलिश बोटांना चिकटणार नाही.
नेल पॉलिशचा वापर रिमूव्हर म्हणून करा
रिमूव्हर नसेल तर जुन्या नेलपॉलिशवर ताज्या नेलपॉलिशचा कोट लावून लगेच पुसून टाका. यामुळे जुनी नेलपॉलिशची शेड निघून जाईल.
थंड पाण्याची जादू – नेलपॉलिश सुकवायला वेळ नसेल तर लावल्यानंतर थंड पाण्यात बोटे बुडवा. यामुळे ते पटकन सुकून जाईल.
ब्लो ड्रायचा वापर- कोल्ड सेटिंगवर ब्लो ड्रायर चालवून तुम्ही तुमचे नेलपॉलिश वेगाने सुकवू शकता.
फॉयलचा वापर. – घरी जेल मॅनिक्युअर काढण्यासाठी, रिमूव्हरमध्ये भिजवलेले कापसाचे गोळे नखांवर लावा आणि फॉइलने झाकून अर्धा तास सोडून द्या.
निलगिरीच्या तेलाची जादू – तुमची आवडती नेलपॉलिश सुकली असेल तर त्यात निलगिरीच्या आवश्यक तेलाचे काही थेंब टाका. म्हणजे ते पुन्हा वापरता येईल.
गरम पाण्याची कमाल – नेलपॉलिशचे झाकण उघडत नाही का?, एक कप गरम पाण्यात नेलपॉलिशची बॉटल काही वेळ तशीच ठेवा. ती काही काळाने उघडेल.
नीट स्टोअर करा – आवडत्या नेलपॉलिशची शेड जास्त काळ वापरण्यासाठी फ्रीजमध्ये तशीच ठेवा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम