सोमवारी हे उपाय केल्यास होईल सुख-समृद्धी प्राप्ती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ हिंदू धर्माच्या परंपरेनुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे, त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. सोमवार हा भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा करण्याचाही दिवस आहे. अनेकजण या दिवशी उपवास करतात. या दिवशी विधिवत पूजा करण्यासोबतच ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय केल्यास प्रत्येक दुःखातून मुक्ती मिळते, अकाल मृत्यूच्या भयापासून देखील मुक्ती मिळते. यासोबतच सुख-समृद्धीही प्राप्त होते. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

या मंत्राचा जप करा- सोमवारचा संबंध भगवान शिवाशी आहे. या दिवशी ‘ओम नमः शिवाय’ चा 108 वेळा जप करा.

शिवस्तोत्राचे पठण- सोमवारी शिवस्तोत्राचे पठण करावे. दररोज याचे पठण केल्याने सर्व रोग, दोष आणि भय दूर होतात.

चंदनाचा तिलक लावावा- पांढऱ्या रंगाचे चंदन भगवान शंकराला खूप प्रिय आहे, त्यामुळे देवाची पूजा करताना चंदन लावा.

शिवरक्षा स्तोत्राचे पठण- पैशाची तंगी दूर करण्यासाठी दर सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचा पाठ करा.

अभिषेक करा- महादेवाच्या पिंडावर दुधाचा अभिषेक करा, त्यासोबत बेलपत्र, धतुरा वगैरे अर्पण करा. वैवाहिक जीवनात अडचण येत असल्यास जलाभिषेक करा. आर्थिक चणचण असल्यास

गंगाजलाने अभिषेक करा.

या गोष्टी दान करा- पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी काळे तीळ मिसळून कच्च्या तांदळाचे सोमवारी दान करावे.

या गोष्टी करणे टाळा

सोमवारी केसं आणि नखं कापणे टाळा.

सोमवारच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम