रविवारी हे उपाय केल्याने आयुष्यातील दारिद्र्य निघणार !
दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ । रविवारी भगवान सूर्याची पूजा केल्याने विशेष फळ मिळते व हिंदू धर्मात रविवार हा भगवान सूर्याला समर्पित आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील सूर्य कमजोर स्थितीत असेल तर रविवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्याने केवळ भगवान सूर्यच प्रसन्न होत नाहीत तर जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने व्यक्तीच्या पत्रिकेतील सूर्याची स्थिती मजबूत होते. इच्छित परिणाम प्राप्त होतात आणि आत्मविश्वास वाढतो. समाजात मान-सन्मान वाढतो. दारिद्र्य आणि दुःखही तुमच्या जीवनातून निघून जातात. प्रत्येक कामात यश मिळते. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
रविवारी भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. हे स्तोत्र भगवान सूर्याला प्रिय मानले जाते. याचे पठण केल्याने देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. यामुळे सुख आणि शांती मिळते. याचे पठण केल्याने कामाच्या ठिकाणी यश मिळते.
अनेक वेळा मेहनत करूनही अनेकांना पैशांसंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत रविवारी तांब्याचे भांडे किंवा गहू दान करावे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. जीवनात सकारात्मक बदल होतात. भगवान सूर्याचे उपाय केल्याने माणसाला उत्तम आरोग्याचा आशीर्वादही मिळतो.
रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते. ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.
रविवारी पाण्यात काही वस्तू टाकून स्नान केल्यास शुभ फळ मिळते. या दिवशी पाण्यात लाल फुले, लाल चंदन, ज्येष्ठमध, केशर आणि वेलची टाकून स्नान करावे. यामुळे तुमच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असेल. हा उपाय केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात.
रविवारी स्नान केल्यानंतर कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावावा. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर लाल टिळा कपाळावर लावून जा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचे वलय तुमच्या भोवती राहते. त्यामुळे तुमचे रखडलेले कामही पूर्ण होऊ लागते.
रविवारी मुंग्यांना साखर खाऊ घाला. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम