माणसाच्या अधोगतीस या गोष्टी ठरतात कारणीभूत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ ।  हिंदू धर्माच्या १८ महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात अशा काही. गरुड पुराणानुसार माणसामध्ये असणाऱ्या काही सवयी हे त्याला अधोगतीकडे घेऊन जाते. या सवयी वेळीच सोडल्या नाहीत तर माणूस दरिद्रीच्या दिशेने वाटचाल करू लागतो. अल्पावधीतच तो राजाचा रंक बनतो . गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद मिळतो. जाणून घेऊया अशा सवयीनबद्दल ज्यापासून अंतर ठेवणे योग्य आहे.

अहंकार: गरुड पुराणानुसार, व्यक्तीने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये. अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते. व्यक्ती समाजापासून दूर जाते. अशा व्यक्तीचे कोणाशीही पटत नाही. आजच्या युगात लोकांना संपत्ती, जमीन, बंगला, महागडी गाडी अशा अनेक गोष्टींचा अहंकार आहे. काहींना सुंदर दिसण्याचा अहंकार आहे तर काहींना आपल्याला कशाचाच अहंकार नाही याचा देखील अहंकार आहे.

लोभ: कोणत्याही गोष्टीचा लोभ असणे ही अत्यंत वाईट सवय आहे. लोभ मनुष्याला अधोगतीकडे नेते. लोभ आनंदी जीवन नष्ट करतो. लोभी स्वभावाची व्यक्ती मेहनती नसते. कठोर परिश्रम करण्याऐवजी ती चुकीचा मार्ग स्वीकारतो आणि अशा परिस्थितीत ती व्यक्ती जीवनातील सुखांचा आनंद कधीच घेऊ शकत नाही.

असाहाय्याचे शोषण: गरुड पुराणानुसार जीवनात कोणत्याही गरीब, असहाय्य व्यक्तीचे शोषण करू नये. हक्क हिरावून घेणारे फार लवकर गरीब होतात. अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही.

घाणेरडे कपडे घालणे: गरुड पुराणात स्वच्छ कपडे घालण्याला महत्त्व देण्यात आले आहे. अनेकांना मळकट, अस्वच्छ कपडे घालण्याची सवय असते. गरुड पुराणानुसार असे लोकं जे घाणेरडे कपडे घालतात, आंघोळ करत नाहीत आणि नखं घाण करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम