घरगुती सिलिंडरच्या किमती वाढणार !
बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या ९ वर्षापासून सुरु असलेल्या महागाई कुठेही कमी होत नाही आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या आर्थिक विवंचनेतून समस्या कमी होत नाही आहे. तीन वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जवळपास दुप्पट झालेल्या असताना ग्राहकांची सबसिडी २०२१-२२ मध्ये १८११ कोटी रुपयांपर्यंत कमी झाली आहे. १ जानेवारी २०१० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०१३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली.
२०१२-१३मध्ये यूपीएच्या कालावधीत ४१५६५ कोटी रुपयांचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर एलपीजीवरील सबसिडी २०१४मध्ये एनडीएच्या कालावधीत ३,९७१ कोटी रुपये होती. निवडणुका जवळ आल्यावर २०१८ – १९मध्ये एलपीजी सबसिडीचे बिल पुन्हा ३७,२०९ कोटी रुपयांपर्यंत वाढले. त्याच्या पुढच्या वर्षी २४,१७२ कोटी रुपयांपर्यंत घसरले व २०२०-२१मध्ये ते ११,८९६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. २०२२-२३मध्ये निवडणुका जवळ आल्याने अनुदानाचे बिल ६,९६५ कोटी रुपयांनी वाढले आणि अतिरिक्त २२,००० कोटी रुपये तेल विपणन कंपन्यांना एकरकमी भरपाई म्हणून देण्यात आले. निवडणुका जवळ आल्यावर घरगुती एलपीजीसाठीची रक्कम वाढविली जात आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम