अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  जळगाव जिल्ह्यातील जळगाव, रावेर, बोदवड नंतर आता अमळनेर बाजार समितीवर देखील निकाल समोर आला आहे. यात देखील भाजपच्या महायुतीला जबर  फटका बसला आहे. अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडी ११, भाजप ४ , अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत अपक्ष उमेदवारांनी पाठीबा दिला आहे असे आमदार अनिल पाटील यानी देशदूत शु बोलताना सागितले. तिन्ही अपक्ष उमेदवारांनी मविआला पाठिंबा दिला असून मविआने अमळनेर बाजार समितीत १४ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

अमळनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले असून विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला अकरा जागा तर भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी माजी आमदार डाँ बी एस पाटील यांच्या नेतृत्खावाली असलेल्या पॅनलला चार जागेवर विजय मिळाला आहे.असून अपक्ष म्हणून एक जागा विजयी झाली आहे.

पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघातून अशोक आधार पाटील -७२१, सुभाष पाटील -६५६ सुरेश पिरण पाटील -५०७,अशोक हिम्मत पाटील-४२१ भोजमल मालजी पाटील -३९४ स्मिताताई उदय वाघ-७२६ अपक्ष नितीन बापूराव पाटील -४०९ सुषमा देसले – ६३४, पुष्पा पाटील -५९३ सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघातून समाधान धनगर – ६०३ इतर मागास वर्गीय मतदार संघ डॉ अनिल शिंदे -७२२ ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ प्रफुल्ल पाटील – ५०६ सचिन पाटील – ५१०ग्रा प आर्थिक दुर्बल मतदार संघ हिरालाल पाटील – ४८१ ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदार संघ भाईदास भिल – ४३३हमाल मापाडी मतदार संघ शरद पाटील – १९५ हे विजयी झाले आहेत व्यापारी मतदार संघाचे अपक्ष वूषभ पारेख, प्रकाश अमूतकर दोन उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत तसेच नितीन बापूराव पाटील हेही अपक्ष निवडून आले असून त्यांनीही मविआ ला पाठिंबा दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम