ते पत्र वाचून पंतप्रधान मोदी झाले भावूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड झाला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तुमच्याकडून आलेली लाखो पत्रे वाचून मी खूप भावूक झालो आहे. असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या एपिसोडची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम लंडन ते UN च्या मुख्यालयात प्रसारित केला जात आहे. भाजपनं याला ‘मेगा इव्हेंट’ बनवले आहे. दरम्यान, मोदी भावूक झाले. आज मन की बातचा १०० वा भाग आहे. मला तुम्हा सर्वांचे लाखो संदेश आले आहेत. मी शक्य तितके संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्वाचे हे संदेश वाचून मी अनेकवेळा भावूक झालो. मन की बातच्या या १०० व्या भागासाठी तुम्ही माझे अभिनंदनही केले आहे, पण खरे तर तुम्ही श्रोते यासाठी अभिनंदनास पात्र आहात. तुम्हा सर्व देशबांधवांचे मी आभार मानतो.

‘मन की बात’ हा अहंकारापासून विश्वापर्यंतचा प्रवास आहे. तुम्ही कल्पना कराल की माझा कोणीही देशवासी ४० वर्षांपासून निर्जन टेकडीवर झाडे लावत आहे. अनेकजण जलसंधारणासाठी तलाव बनवत आहेत. ते साफ करणे. कोणीतरी ३० वर्षांपासून मुलांना शिकवत आहे. कोणीतरी गरीबांना मदत करत आहे. ‘मन की बात’मध्ये त्यांचा अनेकवेळा उल्लेख करताना मी भावूक झालो. या कार्यक्रमामुळे मी तुमच्याशी जोडलो गेलो. हा एक असा कार्यक्रम बनला ज्याद्वारे मी तुमच्या विचारांशी परिचित होऊ शकलो. मी तुमच्यापासून दूर आहे असंही वाटलं नव्हतं. हा माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे. या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगदरम्यान मी खूप वेळा इतका भावूक झालो की त्याचे पुन्हा रेकॉर्डिंग करावे लागले. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. असं मोदी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम