जोडीदारावर संशय घेवू नका ; आजचे राशिभविष्य दि ३ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  मेष – पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचा निर्णय घाईने घेऊ नये.

वृषभ – जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. हाडशी संबंधित समस्या जाणवतील. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. वाणीवर ताबा ठेवावा.

मिथुन – प्रवासाचा योग्य संभवतो. अनेक दिवसांपासून योजना करीत असलेली गोष्ट सत्यात येईल.

कर्क – कामांचा आळस करणे महागात पडेल. पित्ताचा त्रास संभवतो. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहारात डोळसपणे विश्वास ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नये.

सिंह – कार्यालयीन कामाचे कौतुक होईल. व्यापार्‍यांना परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. तत्वाने वागा. क्षणिक नफ्यासाठी तत्वांशी तडजोड करू नका. भावंडांसोबत दिवस आनंदात जाईल.

कन्या – या राशीच्या लोकांवर कार्यालयात कामाचा अतिरेक झाल्यामुळे दबाव वाढेल. आज व्यवसाय सामान्य राहील. पोटाशी संबंधित आजार जसे की बद्धकोष्ठता, गॅसची समस्या जाणवेल. वडिलोपार्जित व्यावसायिक लोकांशी संबंध आणि संपर्क मजबूत करून नफा कमवू शकतील.

तूळ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक– मानसिक ताण हलका होईल. धार्मिक कामात मन रमेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून उत्पन्नाचे मार्ग खुलतील. दिवस आनंदात जाईल.

धनु– दिवस अतिशय चांगला आहे. जबाबदारीने कामं करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा. समाधानी वृत्ती ठेवल्याने भविष्यातील हानी टळेल.

मकर– मानसिक ताण जाणवू शकतो. धार्मिक कार्यानिमित्त्य प्रवास संभवतो. मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यक्रमात मान मिळेल. पैशांचा अपव्यय टाळा.

कुंभ– सहलीला जाण्याचा बेत आखाल. इतरांचे मन जपण्यासाठी मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक सुबत्ता लाभेल. व्यसनांपासून दूर राहा. वाताचा त्रास संभवतो.

मीन– मोठे निर्णय पुढे ढकलावे. आत्मविश्‍वासात ठेवा आणि स्वतःमध्ये नेतृत्व विकसित करा. जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते. कुटुंबातला कलह थांबविण्यासाठी पुढाकार घ्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम