इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात विविध पदासाठी भरती ; असा करा अर्ज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील दहावी पास युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये नोकरीची संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात हवालदार पदांसाठी भरती प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करा. इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

BJP add

रिक्त पदांचा तपशील
एकूण रिक्त पदं : 287

कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं

कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं

कॉन्स्टेबल मोची : 31 पदं

कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं

कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं

कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं

शैश्रणिक पात्रता – इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) हवालदार (Constable) पदांसाठी 287 जागांवर भरती करण्यात येणार आहे. कांस्टेबल टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावं. तसेच संबंधित विभागात आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तर कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमॅन आणि बार्बर पदासाठी अर्झ करणाऱ्या उमेदवाराचे दहावी शिक्षण पूर्ण झालेले असावे.

वयोमर्यादा – कॉन्स्टेबल , टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 से 23 वर्ष या दरम्यान असावं. तर कॉन्स्टेबल, सफाई कर्मचारी आणि बार्बर पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असावं.

पगार – या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्तर तीननुसार वेतन मिळेल. सातव्या वेतन आयोगानुसार, उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. याबाबत अधिक तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम