दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववी च्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यात प्राथमिक गटात कल्पेश सोनवणे ,भाविका महाजन,गौरंगी बारी,दर्शन पाटील,रिया कोठावदे,ईश्वरी शेळके,श्लोक पाटील,नेत्रा चौधरी,आराध्या जोहरे,वंश जगताप,पूर्वा बारी,सुमेश नागपुरे,वेदांत भारुळे,मानसी पाटील,मानस राव,आर्यन सोनवणे,जान्हवी सपकाळे,पलक नागपुरे,वैष्णवी पाटील,गार्गी पवार तर माध्यमिक गटात यश चौधरी ,कैवल्य जाधव ,भैरवी पाटील ,शोएब तडवी ,अवचित देवानंद ,सोहम पाटील ,हरसान तडवी ,विनीत पाटील ,निखिल धारकर ,साक्षी इंगळे, ,भार्गवी भंगाळे ,पूर्वा चौधरी यांना शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या कविता लक्ष्मीकांत पाटील यांना बक्षिसाच्या रकमेचा चेक या वेळी वितरीत करण्यात आला.
शिष्यवृत्तीचे वाटप के सी ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी शाळेच्या मुख्या.प्रणिता झांबरे तसेच मुख्या. धनश्रीफालक पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पराग राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम