![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2024/04/IMG_4473.jpeg)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यामार्फत राज्य पात्रता चाचणी परीक्षा (सेट) जळगाव केंद्रावर
दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यामार्फत रविवार दि. ७ एप्रिल रोजी ३९ वी राज्य पात्रता चाचणी परीक्षा (सेट) जळगाव केंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी ३ हजार ७३० विद्यार्थी बसले आहेत.
जळगाव शहरातील ८ केंद्रावर सेट परीक्षा होणार आहे. अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव तथा या परीक्षेचे समन्वयक डॉ. विनोद पाटील यांनी दिली. परीक्षा केंद्र पुढील प्रमाणे १) मु.जे. महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद भवन – अ (केंद्र क्रमांक १४०१), २) स्वामी विवेकानंद भवन – ब (केंद्र क्रमांक १४०२), ३) स्वामी विवेकानंद भवन – क (केंद्र क्रमांक १४०३), ४) के.सी.ई. शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केंद्र क्रमांक १४०४), ५) ए.टी. झांबरे महाविद्यालय – अ (केंद्र क्रमांक १४०५), ६) ए.टी. झांबरे महाविद्यालय – ब (केंद्र क्रमांक १४०६), ७) के.सी.ई.चे इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर (केंद्र क्रमांक १४०७), ८) के.सी.ई.चे अभियांत्रिकी महाविद्यालय (केंद्र क्रमांक १४०८).
या परीक्षेसाठी प्रवेशपत्र setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यावर दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. अर्ज भरतांना वापरलेला लॉग इन व पासवर्डचा वापर करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम