डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । देशात कोरोना काळात अनेक लोकांना वैद्यकीय सेवेत पुरेशी मदत न मिळाल्याने व या दिवसात सर्वात मोठी उलाढाल हि वैद्यकीय क्षेत्रातून झाल्याने अनेकांनी या क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न बघत आहे. पण निव्वळ वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या संस्था असतात त्यात कुठे काम करणार हे देखील खूप अवलंबून असते.
सर्वांनाच त्यांची स्वप्नं पूर्ण करता येत नाहीत. काहींना ‘नीट’ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करता येत नाही. काहींना खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी परवडत नाही. काही मुलं वर्षाचा गॅप घेऊन अभ्यास करतात आणि पुन्हा नीट परीक्षेला बसतात तर, काही जण दुसऱ्या एखाद्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न कायम उद्भवतो. तो म्हणजे, एमबीबीएस आणि बीएएमएसमध्ये काय फरक आहे? एमबीबीएसची पदवी असलेले डॉक्टर हॉस्पिटल्स, क्लिनिक्स किंवा रिसर्च फॅसिलिटीजमध्ये काम करतात. बीएएमएसचा विचार केल्यास, हे शिक्षण पदवीधरांना आशादायक भविष्य देण्याबरोबरच ह्युमन अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीचं ज्ञान देते. एमबीबीएस आणि बीएएमएससाठी, एका वर्षाच्या इंटर्नशिपसह एकूण साडेपाच वर्षं लागतात. त्यामुळे नेमका कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा हा संभ्रम अगदी सहज निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यापूर्वी एकदा दोन्ही अभ्यासक्रमांच्या फीवर लक्ष दिलं पाहिजे.
कोणत्याही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (एरियानुसार) एमबीबीएसची किमान फी वार्षिक एक लाख रुपये आहे. बहुतांश महाविद्यालयांची फी वार्षिक 36 हजार ते 60 हजार रुपये असून, वसतिगृहांची फी सुमारे पाच ते 10 हजार रुपये आहे. या तुलनेत अगदी स्वस्त खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक 14 ते 15 लाख रुपये लागतील. सरकारी महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी 40 ते 50 हजार रुपये वार्षिक खर्च येतो. आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या खासगी महाविद्यालयाची वार्षिक फी दोन ते चार लाख रुपयांपर्यंत असते.
म्हणजेच, सरकारी संस्थेत साडेचार वर्षांचा कोर्स जास्तीत जास्त 2.25 लाख रुपयांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो. तर, खासगी कॉलेजमध्ये त्या कोर्ससाठी 18 लाख रुपये लागू शकतात. यामध्ये वसतिगृहाचा खर्चदेखील असतो. नियमित एमबीबीएस अभ्यासक्रमापेक्षा बीएएमएस कशा प्रकारे वेगळं आहे, हा प्रश्नही काहींच्या मनात असतो.
आयुर्वेद आणि आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रातल्या करिअरमध्ये स्वारस्य असलेले विद्यार्थी बीएएमअससाठी प्रवेश घेऊ शकतात. बीएएमएसचा अर्थ ‘बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी’ असा आहे. हा अभ्यासक्रम एकूण साडेपाच वर्षांचा असतो. त्यामध्ये एका वर्षाच्या इंटर्नशिपचा समावेश असतो. साडेपाच वर्षांचा संपूर्ण कोर्स हा चार प्रोफेशन्समध्ये विभागलेला आहे. आयुर्वेदाची व्याप्ती भारतात आणि जगभरात वाढत आहे. दीर्घकालीन आणि असाध्य आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद वैद्यकीय प्रणाली आणि त्यातील औषधांचा वापर सुरू झाला आहे. आयुर्वेद वैद्यकीय प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी अनुभवाला जास्त महत्त्व आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम