या सगळ्यांना हाकलून द्या ; ठाकरे गटाने दिली प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ ।  राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा प्रसाद लाड यांनी वक्तव्य केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद पेटत आहे. तर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी त्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते वारंवार शिवरायांचा अपमान करत आहेत. कुठल्या शब्दात संताप व्यक्त करावा कळत नाहीये. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या!, असा संताप सावंत यांनी व्यक्त केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांच्या मनात प्रेम, आदर आणि अस्मिता आहे. त्यांच्याबाबत एकही अवाक्षक खपवून घेणार नाही, असं अरविंद सावंत म्हणालेत.
भाजपवाल्यांना इतिहास नरेंद्र मोदींचा तयार करायचा आहे. यांचा स्वातंत्र्यलढाशी देखील संबंध नाही.सत्ता पैसा आणि माज एवढंच यांना कळतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाडपर्यंत या सगळ्यांना हाकलून दिलं पाहिजे, असं सावंत म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या अशी माणसं महाराष्ट्राला कलंक आहेत. हे लोक इतके घाणेरडे आहेत त्यांना इतिहासाची जाणीव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांनी कधी वाचन केलेलं नाही. लिखाण केलेलं नाही, तरी हे लिहितात छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद भाजप के… या भाजपला साथ लाथ मारून हाकलून दिला पाहिजे, असं अरविंद सावंत म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम