ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक अमळनेर येथे खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न…

बातमी शेअर करा...

. अमळनेर (आबिद शेख)
जिल्ह्यातील कार्यरत १५ तालुक्यांपैकी १० तालुक्यांचे तालुकाध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी असे २५ कार्यकर्ते उपस्थीत होते.
अनुपस्थित तालुके – १) पारोळा,२) जामनेर ,३)धरणगाव , ४)भडगाव, ५)पाचोरा .
बैठकीस जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा सचिवांनी संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले.
शासकीय कार्यक्रमावर अवलंबून न राहता संघटनास्तरावर २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करावा,असे सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितले .
उपस्थीत सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नव नियुक्त महिला जिल्हा अध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्य कार्यकारिणी च्या वतीने पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम