चाळीसगावात पुरवायचा ड्रग्स : पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ नोव्हेबर २०२३

राज्यात सध्या ड्रग्स माफिया ललित पाटील यांचे प्रकरण चर्चेत असतांना आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात देखील एका ड्रग्समाफियाला पोलिसांनी पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  एक तरुण चक्क मालेगावातून चाळीसगाव शहरात ड्रग्स पुरवीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम क्रिस्टल एमडी (ड्रग्स) जप्त केले असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरात क्रिस्टल एमडी नामक ड्रग्स विक्री होणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकाला शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने शेख मोहम्मद उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. ४ था माळा समरू बाग, तेली चाळ हसन शेठ बिल्डींग, भिवंडी, ता. ठाणे ह.मु. साठ फुटी रोड, पॉवर हाऊस, जिरे बाबा दर्गा, मालेगाव) हा दुचाकीवर क्र (एम. एच. ४९ ए.एच ७७५) संशयितरित्या फिरतांना दिसून आला.

यामुळे शेख मोहम्मदवर संशय आल्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २० हजार २४० रुपये किमतीचे क्रिस्टल एमडी (ड्रग) अमली पदार्थ मिळून आले. शहरात कारवाई करताना निवडणूक नागव तहसीलदार संदेश निकम व कर्मचारी उपस्थित होते. संशयितास पोलिस पथकाने ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकाँ राहुल सोनवणे, पोहेकॉ संदीप पाटील, चापोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोका ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ महेश बागुल, पोका संदिप पाटील, पोक आशुतोष दिलीप सोनवणे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम