पालकमंत्री पाटील यांचे बंधू कैलास पाटील यांचे निधन !
बातमीदार | ८ नोव्हेबर २०२३
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि. ८ नोव्हेबर रोजी पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि.८ नोव्हेबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघणार आहे. पालकमंत्री पाटलांच्या कार्यकर्त्यांना हि वार्ता जशी माहित पडत असल्याने अनेक कार्यकर्ते पाळधीकडे रवाना होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम