
घसा कोरडा पडतोय ; तत्काळ व्हा सावध होवू शकतो गंभीर आजार !
दै. बातमीदार । १५ फेब्रुवारी २०२३ । सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेक आजार सहजपणे होणं कॉमन झालं आहे. या सोबत आपले नेहमीच्या आहार घेण्याची जर वेळ बदलली तर हमखास तुम्हाला कुठला ना कुठला आजार असल्याचे दिसून येते. असाच एक आजार आहे ब्लड शुगर म्हणजे डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हाइपरग्लाइकेमिया म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी फार घातक असते. याची पुढची स्टेज हार्ट अटॅक असते. ज्यात व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
डॉक्टरांनुसार, जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीरात काही खास संकेत देऊ लागतं. अशात स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो. त्यासोबतच पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याचीही इच्छा होते. स्किन इन्फेक्शन, धुसर दिसणे, ब्लॅडर इन्फेक्शन होणे, अचानक वजन कमी होणे, हे सगळे या गोष्टीचे संकेत आहेत की, तुमच्या ब्लडमध्ये शुगर हाय लेव्हल होत आहे. जी तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज आहे.
मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, ब्लड शुगर हाय होणं कुणासाठीही जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणंच चांगलं ठरतं. शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढण्याच्या कारणांमध्ये डिहाइड्रेशन, शारीरिक व्यायामाची कमतरता, जास्त खाणं, मानसिक तणाव, डायबिटीसची औषधं घ्यायला विसरणं किंवा एखा जुना आजार यांचा समावेश आहे.
जर तुम्हाला शरीरात ब्लड शुगर हाय होताना दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. नेहमी सोबत डायबिटीस कंट्रोल करणारी औषधं ठेवा. जर रात्री तुमची शुगर वाढली आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कुणालातरी सोबत घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जावे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम