
सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या काय आहे भाव !
दै. बातमीदार । १५ फेब्रुवारी २०२३ । जागतिक बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण आहे. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीची किंमतीत बदल पाहायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी सकाळच्या व्यवहारात, 5 एप्रिल 2023 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचे वायदे 0.33 टक्क्यांनी घसरून 56,563 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
चांदीचे दर 0.49 टक्क्यांनी स्वस्त होऊन 65,926 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. 1 ग्रॅमसाठी भाविकांना 5,716 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 24 कॅरेट सोन्यासाठी GST वगळून 56 हजार 160 तर GST आणि RTGS पकडून ५७,५०० रुपये मोजावे लागणार आहे.
कॉपर 0.33 टक्क्यांनी खाली आलं आहे. 775.60 वर पोहोचलं आहे. तर झिंक 0.78 टक्क्यांनी खाली उतरलं आहे. नॅचरल गॅसमध्ये देखील घट झाली आहे. मंगळवारी डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. स्पॉट गोल्ड 1,852.94 डॉलर प्रति औंस वर जवळजवळ सपाट राहिले. त्याच वेळी, अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी वाढून $1,851.80 वर पोहोचले. यूएस सीपीआय जानेवारी ते 12 महिन्यांत 6.4 टक्के वाढला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम