मुसळधार पावसामुळे बळीराजा हवालदिल

पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांतील शेतात पाणी साचल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तसेच कापसाच्या फुलपात्यांचा जमिनीवर खच पडला असून, निसर्गाच्या या कोपामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.१६) रोजी जळगाव जिल्ह्यात तब्बल दोन तास अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जिल्ह्यात कित्येक ठिकाणी कपाशी परिपक्व झाली आहे. कापसाच्या पिकाला वेळेवर कमी पाणी हवे असते परंतु या पावसामुळे पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळत असल्याने तयार झालेल्या कापूस खराब होत आहे. कित्येक ठिकाणी कापसाचे बोंडे काळे पडत आहेत.

त्याचबरोबर अशावेळी पिके पिवळी पडत असून, शेतांना तलावांचे स्वरूप मिळाले आहे. पर्यायी कापूस, मका, तूर, ज्यारी, पीक, मोठ्या प्रमाणावर खराब होण्याबरोबरच पिके आडवी झाली आहेत.

आता शेतकऱ्यांना कापसाच्या हाताशी आलेला पहिला बहर वाया जाण्याची धाकधूकही आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम