जालिंदर पळे यांचेकडे एलसीबीचा पदभार सुपूर्द

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे त्यांच्या बदली, निलंबन व गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईनंतर आता स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) च्या तात्पुरत्या प्रमुखपदाचा कार्यभार याच शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एपीआय जालिंदर पळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परवा (दि.१५) च्या सायंकाळी बकालेंचा तात्पुरता पदभार हा पाचोरा येथील निरीक्षक किसन नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असता, काल (दि.१६) च्या सायंकाळी हा निर्णय बदलून किसन नजन पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.

या संदर्भात आयजी बी.जी. शेखर पाटील यांनी एलसीबीच्याच दुसर्‍या फळीतील अधिकार्‍याकडे पदाचा कार्यभार सुपूर्द करण्याचे निर्देश दिले होते.

नियमित एलसीबी प्रमुख येईपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय जालिंदर पळे यांचेकडे या पदाची जबाबदारी असल्याने सध्या ते या पदावर काम पाहणार आहेत. तरी, रात्री उशिरा याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम