दसरा मेळावा बनले युद्धाचे कारण; होणार जोरदार बलप्रदर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । दसरा मेळाव्याकरिता शिवतीर्थ मैदान काबीज करण्यासाठी एकमेकांशी लढाई करणारे शिंदे गट-ठाकरे गट यांच्यात आता पोस्टर युद्ध सुरू आहे. अशातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टिझर प्रसारित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे. शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा कुणाचा? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला व हे प्रकरण थेट हायकोर्टापर्यंत गेले. शेवटी न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरेंच्या बाजूने कौल दिला गेल्यामुळे शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे ठरले. म्हणून शिंदे गटही दसरा मेळावा दिमाखदार करण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटरच्या माध्यमातून एक टिझर प्रसारित केला आहे. या टिझरमध्ये बीकेसीवर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असल्याचे सांगितले जात आहे.

यानिमित्ताने दोन्ही गटाकडून बलप्रदर्शन होणार असल्याचे वृत्त असून, शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरवर ‘आम्ही विचारांचे वारसदार’ तर दुसऱ्या पोस्टरवर ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ असा उल्लेख आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून ‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा संघर्षाचा वारसा आहे’ असा उल्लेख असलेले पोस्टर्स मातोश्री परिसरात लावण्यात आले आहे. तसेच ठाकरेंनी वाजतगाजत, गुलाल उधळत, शिस्तबद्ध पद्धतीने शिवतीर्थ मैदानावर येण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम