अंगार घेऊन दसरा मेळावा होणार ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार यावर अनेक चर्चा सुरु असतांना शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी माघार घेतल्यावर ठाकरे गटाची सभा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे दिसत असल्याने आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर तुफान टीका केली जात आहे.

शिवसेनेचा (ठाकरे) अंगार घेऊन दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणि पुढे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला देशात महत्त्व प्राप्त करून दिले. आता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतपत त्यांची जीभ घसरल्याचे सांगत शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिवसेने ( शिंदे) वर टीका केली आहे. गद्दारी आणि बेईमानी केलेल्यांनी अंगार असल्याचे बोलू नये. हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि जनतेसमोर जावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपली आहे. शिवसेनेने परवानगी अर्ज मागे घेल्यानंतरही टीका व प्रत्युत्तर सुरूच आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंचे विचार भंगार असल्याची टीका केली होती. राऊत यांनी बुधवारी शिंदे यांना प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतपत त्यांची जीभ घसरली आहे. परंतु ते कोणता विचार महाराष्ट्र आणि देशाला देणार? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक वेगळे महत्त्व आहे. व्हायब्रंट गुजरातच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमावरूनही राऊत यांनी शिंदेंवर सडकून टीकास्त्र सोडले आहे. पुण्यात कुख्यात ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास सरकारमधील मंत्र्यांने मदत केल्याचा आरोप केला जात आहे. दादा भुसे यांची दादागिरी कधी मोडून काढणार आहात की केवळ राजकीय विरोधासाठी ईडी, सीबीआय आणि पोलीस कारवाया करणार ? दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणातील संबंध काय? हा महाराष्ट्राचा सवाल आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची चौकशी करावी. मी याबाबत पत्र लिहिणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम