भिवंडीतील नारपोली पोलीसांची कारवाई : कोट्यावधी रुपयांचा केला अवैध केमिकल साठा जप्त

बातमी शेअर करा...

भिवंडीतील नारपोली पोलीसांनी आपल्या हद्दीतील पूर्णा गाव परिसरातील इताडकर वाडी येथील गोदाम पट्ट्यातील एका अवैध रसायन साठा (केमिकल) असलेल्या गोदामावर छापा टाकून १ कोटी ८० लाख रुपयांचे अवैध ज्वलनशील रसायन साठा जप्त करून तिघान विरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

याच नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रातील पुर्णा गाव, राहानाळ गाव व वळ गाव ग्रामपंचायत हद्दीत सद्या शेकडो अनधिकृत केमिकल गोदामे सक्रिय आहेत.या ठिकाणी विविध प्रकारचे केमिकल येत असून येथे माल चाढवताना व उतरवताना केमिकल संडल्यामुळे आता पर्यंत विविध अपघात घडले आहेत.तसेच या सांडलेल्या केमिकलमुळे परिसरात उग्र वास येऊन ग्रामस्थांना डोळ्यांचे व श्वसनाचे आजार होताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या धाड टाकलेल्या गोदामात विनापरवाना लोखंडी आणि प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये रसायनाचा साठा करण्यात आला होता.या कारवाई नंतर केमिकल माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.या कारवाईत २०७ लोखंडी ड्रम, ९६७ प्लास्टिक ड्रममध्ये ठेवलेले अवैध केमिकल जप्त केले आहे. त्यामुळे अशा केमिकलच्या गोदामांवर नारपोली पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. या गुन्ह्यात नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल बढे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केमिकलच्या गोदामावर छापा टाकला होता.

पाईपच्या साहय्याने टॅंकरमधून ड्रममध्ये केमिकल ओततानारसायने अतिज्वालाग्राही: ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता पूर्णा गाव परिसरातील श्री कॉम्प्लेक्स येथील जय अंबे कंपनीच्या तीन गोदामांवर छापा टाकून १ कोटी ८० लाख २७ हजार ५१६ रुपयांचा अति ज्वालाग्राही रसायनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या छाप्या दरम्यान जीजे १२ सिटी ९२५३ या क्रमांकाच्या टँकरमधून हे केमिकल प्लास्टिक आणि लोखंडी ड्रममध्ये रिकामे केले जात होते. या काळात पोलिसांनी २०७ लोखंडी ड्रम आणि ९६७ प्लास्टिक ड्रममध्ये ठेवलेले केमिकल जप्त केले. अवैध रसायने गुजरातमधून आणली असल्याचे आढळून आले.सदर रसायन हे मानवी जीवनास व प्राणी मत्रास हानिकारक असून या गोदामांमध्ये केमिकलच्या सुरक्षेसाठी कोणतेही नियोजन नव्हते. तसेच त्यांचा साठा करण्याची कोणताही “ना हरकत”दाखला व परवानगी नसून गोदाम मालकाने संबंधित प्रशासनाची व कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

या प्रकरणी पोलीस संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी देवेंद्र पाल याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा, पेट्रो केमिकल कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजा पाटील आणि टँकर चालक कुमरान कुमार यांच्यावर घातक रसायन निर्मिती, साठवणूक आणि आयात नियमां नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले सपोनि विठ्ठल बढे यांनी सांगितले की, जप्त केलेल्या साठ्यामध्ये २५ प्रकारची वेगवेगळी रसायने गुजरातमधून आणली असल्याचे आढळून आले आहे. भिवंडीत सर्वात जास्त अवैध रसायन साठे (केमिकल) हे पूर्णा गाव, रहणाल गाव व वळगाव या ग्राम पंचायत हद्दीत असून या ठिकाणी वेळोवेळी आगी लागण्याचे प्रकार घडत असून यात प्रामुख्याने जानेवारी,फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आगी जास्त लागत असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

ज्यामध्ये अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठा केला जात असतो. या गोदामांमध्ये अग्निसुरक्षेची साधने व उपाय योजना इत्यादी नाहीत. अशा प्रकारे शेकडो केमिकल गोदामांना आग लागण्याच्या घटना नेहमीच येथे घडतात. त्यामूळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. याबाबत गोदाम परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही घातक रसायनाची गोदामे इतरत्र हलवली जात नाहीत. त्यामुळे अत्यंत ज्वलनशील रासायनिक गोदामां जवळ राहणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात असतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम