मागास शब्दापासून मराठवाड्याला मुक्ती मिळाली पाहिजे ; मुख्यमंत्री शिंदे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३

राज्यातील मराठवाडा मुक्तिसंग्रामाला आज ७५ वर्षे पूर्ण होत असून म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आज अमृत महोत्सव दिवस आहे. त्यानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजलील वाहिली. मराठवाड्याला मागास या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहीजे. मराठवाडा समृद्ध व्हावा, अशी आपण प्रतिज्ञा करुया, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिकांच्या अमुल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रीय पाठिंब्यातून मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. याची जाणीव आपण ठेवली पाहीजे. मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहीजे, अशी प्रतिज्ञा यानिमित्ताने आपण करुया. मराठवाड्याचा भूमिला समृद्ध करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध राहू.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही टीका केली. शिंदे म्हणाले, आम्ही आता मराठवाड्याला निधी देत आहोत. मागील सरकारच्या काळात मराठवाड्याचा अनुशेष वाढला. विकास योजनांची तेव्हा अंमलबजावणी केलेली नाही. ही थांबलेली कामे आम्ही सुरू केली. मराठवाड्याच्या विकासाचे पर्व आता सुरू झाले. कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी जवळपास 60 हजार कोटींच्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे. ही कामे आम्ही वेगाने पूर्ण करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याची दुष्काळापासून सुटका करायची आहे. या वर्षी मराठवाड्याला पावसाने ओढ दिली आहे. मी सरकारकडून ग्वाही देतो की, पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांचे नुकासन झाले. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करू.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम