पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

देशातील जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक काश्मिरी पंडिताच्या हत्येत सामील होता, अशी माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती X वरुन दिली आहे.

चकमकीनंतर जवानांकडून परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे याआधी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गेल्या बुधवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते. बासित अमीन भट आणि साकिब अहमद लोन अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दोघेही कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कुज्जरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

माहिती मिळताच सुरक्षा दलानी परिसराला घेराव घालत शोधमोहिम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी सुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले झाले. घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह सापडल्याचे प्रवक्त्याने सांगितले. ते म्हणाले की घटनास्थळावरून दोषी कागदपत्रे, शस्त्रे आणि काडतुसे आणि एके सिरीजच्या दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी हे मोठे यश असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम