क्रिकेट विश्वाची मोठी बातमी : शुभमन गिल रुग्णालयात दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

देशातील क्रिकेट टीममधून एक मोठी बातमी समोर आली असल्याने टीम इंडियाचे आता टेन्शन वाढले आहे. कारण भारतीय सलामीवीर शुभमन गिलची तब्येत बिघडल्याने त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले आहे.

गिलच्या प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय क्रिकेटपटूच्या प्रकृतीवर आणखी परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळला नाही. तसेच तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. आणि आता रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार्‍या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता फारच कमी आहे. अहमदाबादमधील गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अहमदाबादमध्येच त्याने टी-20 मध्ये पहिले शतक झळकावले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात गिलने नाबाद 126 धावा केल्या होत्या. त्याचवेळी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने अहमदाबादमध्ये खूप धावा केल्या आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम