यूट्यूबवर कमविले कोटी रुपये ; आयकर विभागाने टाकला छापा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ ।  गेल्या २०१९ मध्ये कोरोनाचे सावट जगभर पसरलेले असतांना अनेकानी यूट्यूबच्या माध्यमातून अनेक मज्जा केली पण नंतर समजले कि, यावरून पैसे देखील कमविता येत असतात तेव्हापासून अनेक गृहिणीपासून ते तरुणांनी यूट्यूबवर लाखो रुपये देखील कमविले आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आयकर विभागाने एका यूट्यूबरच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात यूट्यूबरकडून 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तस्लीम खान असे या यूट्यूबरचे नाव आहे. तस्लीमवर चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप आहे.
तस्लीम दोन वर्षांपासून आपल्या भावासोबत Trading Hub 3.0 हे यूट्यूब चॅनल चालवत आहेत. या प्लॅटफॉर्मवर ते शेअर मार्केटसंदर्भातील व्हिडिओ टाकतात. अशात, प्रश्न असा उभा राहतो की, YouTube पासून नेमकी किती कमाई होईते? तर तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या YouTube चॅनलपासून चांगली कमाई होते. त्यांनी आतापर्यंत YouTube च्या माध्यमाने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 40 लाख रुपयांचा इनकम टॅक्स देखील भरला आहे.

YouTube पासून किती होते कमाई? – YouTube क्रिएटर्सच्या कंटेन्टवर जाहिरातींच्या माध्यमाने येणारा रेव्हेन्यू शेअर करते. वेगवेगळ्या क्रिएटर्ससाठी रेव्हेन्यूचा शेअर वेगवेगळा असू शकतो. खरे तर YouTube वरून मिळणारे पैसे हे कंटेन्ट, प्रदेश आणि इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. रिपोर्टनुसार, क्रिएटर जाहिरातींमधून मिळणारा रेव्हेन्यू अगदी 55 टक्क्यांपर्यंतही मिळवू शकतात.

ही अट महत्वाची – महत्वाचे म्हणजे, यूजर्सना यासाठी YouTube Partner Program चा भाग व्हावे लागते. या प्रोग्रामला क्वालिफाय होण्यासाठी यूजर्सना चॅनलवर 500 सब्सक्रायबर्स आणि 3000 तासांचा वॉचिंग टाईम होणे आवश्यक आहे. YouTube Shorts च्या माध्यमानेही क्रिएटर्सना पैशांची कमाई होते. 2022 च्या डेटानुसार, अमेरिकेत यूट्यूबर्सची कमाई जवळपास, 4600 डॉलर (लगभग 3,77,234 रुपये) महिना झाली आहे. टक्केवारीचा विचार करता, यूट्यूब क्रिएटर्सना जवळपास 1000 व्ह्यूजवर 18 डॉलर (जवळपास 1558 रुपयांपर्यंत) मिळतात. कुठल्याही क्रिएटरची कमाई, त्याच्या कंटेंट, ऑडिअन्स, व्ह्यूज आणि सब्सक्रायबर्सवर अवलंबून असते. यूजर्स YouTube Shorts च्या माध्यमाने, मेंबरशिपच्या माध्यमाने आणि इतरही काही पद्धतीने पैसे मिळवू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम