एफडीवर वाढणार कमाई ; वाचा सविस्तर !
बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | सध्या नागरिकांकडून बँकेत जमा केल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत त्यांच्याकडून होत असलेली कर्जाची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बँकांमध्ये जमा झालेल्या एफडीमध्ये ६.६ टक्कांची वाढ झाली आहे, तर ग्राहकांनी घेतलेली कर्जे ९.१ टक्क्यांनी वाढली आहेत.
या कालावधीत बँकांमध्ये ठेवींच्या रुपाने ११.९ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले तर बँकांकडून १२.४ लाख कोटी रुपयांची कर्जे ग्राहकांना देण्यात आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून कर्जाची मागणी आणखी वाढू शकते, अशी शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांना वाढीव निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे एफडीचे प्रमाण वाढवण्याच्या हेतूने त्यावर दिलेल्या व्याजाचे दर वाढव शकतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम