क्रिकेट विश्वात महाभूकंप ; ‘या’ खेळाडूने जाहीर केली निवृत्ती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ । देशात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार असून त्याची जोरदार तयारी देखील सुरु असून सर्व संघ या स्पर्धेसाठी सज्ज होत असताना बांगलादेश क्रिकेटमध्ये महाभूकंप झाल्याचे पाहायला मिळतेय… बांगलादेशच्या वन डे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना निवृत्ती जाहीर केली आहे. इक्बालने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दिचा शेवट करण्याचा निर्णय आताच का घेतला हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार हार पत्करल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने हा निर्णय जाहीर केला. पत्रकारांना सामोरे जाताना तमिम प्रचंड भावूक झाला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही अद्याप वन डे संघाचा कर्णधार कोण, हे जाहीर केलेलं नाही. ट्वेंटी-२० व कसोटी संघाचे नेतृत्व अनुक्रमे शाकिब अल हसन व लिटन दास यांच्याकडे आहे. ३४ वर्षीय तमिमने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि त्याआधी तो एप्रिल महिन्यात आयर्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता.

२००७ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तमिमने वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध मॅच विनिंग अर्धशतक झळकावले होते. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १४ शतकांसह ८३१३ धावा केल्या आहेत आणि सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यानंतर तमिमचा क्रमांक येतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७० सामन्यांत ३८.८९ च्या सरासरीने १० शतकांसह ५१३४ धावा केल्या आहेत. तमिमच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ३७ पैकी २१ वन डे सामने जिंकले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम