‘ते’ तुमच्या मांडीवर येवून बसले ; राऊतांनी लगावला टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद जाणार असल्याच्या चर्चा राज्यात व्हायरल होत असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणाले कि, शिंदे सरकारचा खेळ आता औटघटकेचा आहे. कारण बहुमतासाठी 170 चा आकडा असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या 40 जणांचा गट नव्याने सरकारमध्ये सामील केला आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमची गरज संपली. आता तुम्ही गाशा गुंडाळा, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, मंत्रिपदावरून शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची अन् झटापट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, त्यांच्या गटामध्ये काय चालले आहे ते आम्ही पाहायला बसलेलो नाही. अजित पवार यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एका ओळीमध्ये प्रतिक्रिया दिली ‘नांदा सौख्य बरे’. हे होणार हे आम्ही आधीच सांगितले होते. पण, आता त्यांच्याबद्दल ज्या बातम्या आम्ही वाचतोय, पाहतोय हे अपेक्षितच होते. हा त्यांचा औटघटकेचा खेळ आहे.

संजय राऊत म्हणाले की, सरकारमध्ये सामील होताच अजित पवारांच्या 9 मंत्र्यांना तातडीने शपथ दिली जाते. पण, मंत्रिपदासाठी वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना शपथ दिली जात नाही. याचाच अर्थ शिंदे गटाची गरज आता संपली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, ना घर का घाट का अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवस्था आहे. लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळतील. पण ही परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे. स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्य आठवत असतील, तर छगन बुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. त्यांनी बाळासाहेबांना अटक केली, अजित पवार यांच्यामुळे आम्ही पक्ष सोडला म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावे. कारण मांडीला मांडी लावून नाही तर ते आता तुमच्या मांडीवरच येऊन बसलेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम