उन्हाळ्यात काकडी खाणे आहे आरोग्यदायी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ । नेहमी उन्हाळा सुरू झाला की, लोक थंड फळे व पेय घेत असतात अशा वेळी काकडीचं देखील भरपूर सेवन करतात. या दिवसात काकडी खाण्याचे अनेक आरोग्यादायी फायदे होतात. याने शरीराला केवळ व्हिटॅमिनच नाही तर अनेक पोषक तत्व मिळतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवण्याचं कामही काकडी करते. असं असूनही अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नाहीये. ते याबाबत कन्फ्यूज असतात की, काकडी सोलून खावी की न सोलता खावी. आज आम्ही हेच तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी जाणून घेऊ काकडीचे फायदे…

काकडी खाण्याचे फायदे
चेहऱ्यावरील सुरकुत्या होतात दूर
उन्हाळ्यात काकडी नियमित काल तर स्किनची एजिंग म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे चेहरा नेहमीच फ्रेश आणि ताजातवाणा दिसतो. त्वचा अधिक तरूण दिसते.
वजन कमी करण्यास मदत
काकडीमध्ये फायबर प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पोटाचं पचन तंत्र चांगलं काम करतं. याने बद्धकोष्ठता आणि गॅस-अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात. याने पोट भरलेलं राहतं ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाहीत. याने आपोआप वजन कमी करण्यास मदत मिळते.
शरीरात वाढवते पाणी
काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होतं. अशात या दिवसात काकडीचं अधिक सेवन कराल तर शरीर नेहमी हायड्रेट राहणार. जर तुम्ही रोज काकडीचं सेवन कराल तर शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही.
काकडी खाण्याची योग्य पद्धत
आता बोलूया यावर की काकडी खाण्याची योग्य पद्धत काय आहे. काकडी साल काढून ती खावी की सालीसोबत खावी. आयुर्वेदानुसार सांगायचं तर काकडी कधीच साल काढून नाही तर सालीसोबतच खावी. कारण काकडीच्या सालीमध्ये अनेक महत्वाचे तत्व असतात. जे साल काढून आपण दूर करतो. पण ती खाण्याआधी त्यातील कडवटपणा दूर केला पाहिजे. सोबतच काकडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम