माजी मंत्री मुश्रीफ यांच्याशी संबधित व्यावसायिकांच्या घरावर ईडीची छापेमारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ ।  राज्यात नुकतीच संभाजी नगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यासह उद्धव ठाकरेंनी सत्ताधारीसह शिंदे गटाला रडारवर घेतल्यानंतर अगदी काही तासातच पुण्यात आता कारवाई सुरु झाली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे.

सोमवारी सकाळीच​​​​​​ पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलिस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे.

ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणांच्या जागेवर जाण्यास इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांच्याशी संबंधित वेगवेगळे व्यवसायिक यांच्याशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याची कोणती कागदपत्रे आहेत त्याबाबत कोणते पुरावे मिळू शकतात का ? याबाबतची तपासणी ईडीच्या पथकामार्फत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी मोठ्या प्रमाणात छापेमारी होत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या इडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. मुश्रीफ यांनी कोट्यवधींची लूट केली असून भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम