तरुणाईसाठी नवाकोरा चित्रपट ‘एकदम कडक’ पोश्टर आलं’

बातमी शेअर करा...

जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२२  काही चित्रपट भावनिक, कौटुंबिक, प्रेमकथा, भयरस अशा विविध श्रेणींवर आधारित असतात. अशा विविध श्रेणीच्या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे. हा चित्रपट मस्त कलंदर तरुणाईच्या मनाला भावणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे कमालीचे पोस्टर रिलीज झाले आहे. अत्यंत आकर्षक, रोमॅंटिक आणि तरुणाईला समजेल असे या चित्रपटाचे पोस्टर आहे. या चित्रपटाचे नाव ‘एकदम कडक’ असून यामध्ये अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे आणि अरबाज हे तरुण कल्ला करताना दिसणार आहेत.

 

अभिनेता पार्थ भालेरावने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टसोबत त्याने एकदम कॅप्शन लिहिलं आहे. पार्थने लिहिलंय कि,, ‘आलं रे आलं … ‘एकदम कडक’ पोश्टर आलं!! ओम साई सिने फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, ‘गणेश शिंदे’ निर्मित आणि दिग्दर्शित #EkdamKadak २ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या थिएटरात.’ हे पोस्टर नीट पाहिलं तर कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांची कॉलेज लाईफ यावर आधारित चित्रपट आहे हे समजून येत. पण या पोस्टरमध्ये ती मुलगी कोण आहे…? हे काही समजत नाही.
या आकर्षक आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात नेमकं एकदम कडक म्हणजे काय कथानक असणार आहे..? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या २ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलंय. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप यांचे आहेत आणि चित्रपटासाठी संगीत स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी दिले आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांचे स्वर चित्रपटातील गाण्यांना लाभले आहेत. तर या चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम