जळगावात मार्चमध्ये 4 जी तर 5 जी ऑगस्टपर्यंत होणार सुरु

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  येत्या वर्षामध्ये बीएसएनएलची मार्चमध्ये 4 जी सेवा तर ऑगस्टमध्ये 5 जी सेवा जळगावमध्ये सुरू होणार आहे. यात खासगी कंपन्यांची ही सेवा विदेशी तंत्रज्ञानावर आधारित असली तरी बीएसएनएलची 4 जी व 5 जी सेवा संपूर्णत: मेकिंग इंडिया अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित राहणार असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.

बीएसएनएल सोडून इतर खासगी कंपन्यांची 4 जी, तर काही शहरात 5 जी सेवा सुरू आहे. मात्र, यात बीएसएनएल अजूनही 3 जी सेवेवरच अडकली आहे. खासगी कंपन्यांची 4 जी सेवा आधीपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. तर 5 जी इंटरनेट सेवा ही देशातील काही शहरात सुरू झाली आहे. मात्र, बीएसएनएलची 4 जी सेवा अजूनही सुरू झाली नाही. मात्र, मार्चपर्यंत 4 जी तर ऑगस्टपर्यंत 5 जी ही संपूर्ण देशी टेक्नॉलॉजीने युक्त अशी इंटरनेट सेवा जळगावात सुरू होणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेटचा डाटा स्पीड मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
नवसंजीवनी ठरेल
बीएसएनएलचे कामगार कपात धोरण, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती, यात भर म्हणजे इतर खासगी कंपन्यांचे वाढणारे ग्राहक तर बीएसएनएलचे घटनारे ग्राहक ही मोठी चिंतेची बाब आहे. मात्र, अजूनही सर्वसामान्य ग्राहकांचा बीएसएनएलवर भरवसा आहे. 4 जी व 5 जी इंटरनेट सेवा शहरात दाखल झाल्यानंतर ग्राहकांमध्ये वाढ होईल. त्यामुळे बीएसएनएलसाठी 4 जी व 5 जी इंटरनेट सेवा नवसंजीवनी ठरू शकेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम