निवडणूक आयोगच घेणार ‘राजकीय पक्ष कोण’

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीच्या गटाची 30 तारखेला देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला बहुसंख्येने पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांची सर्वानुमते नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याच दिवशी म्हणजे 30 तारखेलाच दिल्लीत मुख्य निवडणूक आयोगात एक याचिका दाखल करत आम्हाला असे काम करायचे असून पक्षाचे नाव आणि चिन्ह आमच्याकडेच रहावे अशी विनंती आम्ही प्रतिज्ञापत्रांसह केली आहे.

अनिल पाटील आमचे प्रतोद असल्याचे आम्ही विधानसभा अध्यक्षांना कळवले आहे. तसेच विधान परिषदेत अमोल मिटकरी हे प्रतोद असतील. नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून कार्यकारी अध्यक्ष आणि प्रतोदांची निवड 30 जूनलाच झाल्याचे पटेल यांनी सांगितले.

दिल्लीत झालेली राष्ट्रवादीची बैठक अनधिकृत असल्याचा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना शिवसेनेच्या राजकीय पक्षाच्या दावेदारीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचा दाखलाही प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवले. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष एकमेकांशी जोडलेले असल्याचे म्हणणे चुकीचे असेल असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आम्हाला कुठल्या पक्षात विलीन व्हायचे असेल तो भाग पूर्ण वेगळा आहे. पण पक्षांतर्गत जर काही असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थांबवता येत नाही.

राजकीय पक्ष कोण आहे याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. तर विधीमंडळ पक्षासंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. निवडणूक आयोगाकडे 30 तारखेला अजित पवार यांनी याचिका दाखल केली आहे अशी माहितीही पटेल यांनी दिली आहे. काल झालेली बैठक आणि कारवाईसंदर्भात आम्हाला एकच म्हणायचे आहे की, जयंत पाटील यांनी अजित पवार आणि इतर 9 जणांविरोधात अपात्रतेच्या कारवाईचा अर्ज दाखल केला आहे. पण जयंत पाटील हे आमचे अध्यक्ष आहेत का हाच प्रश्न आहे. एकाही आमदाराला अपात्रतेची कारवाई लागू होऊ शकत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम