भडगाव भाजपा तालुका अध्यक्षपदी सोमनाथ पाटील यांची निवड

अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता अशी यांची प्रतिमा

बातमी शेअर करा...

भडगाव (प्रतिनिधी)

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असुन भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी नवीन तालुकाध्यक्ष जाहीर केले आहेत. भडगाव तालुका अध्यक्ष पदासाठी सोमनाथ पाटील यांचे नाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज पाटील यांनी आज जाहीर केले आहे.

पत्रकार संघ, बजरंग दल व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ सोमनाथ पाटील यांनी भडगाव तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
भडगाव तालुक्यातील एक अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता अशी सोमनाथ पाटील यांची जनमानसात प्रतिमा असून त्यांची भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज पाटील, खा. उन्मेष पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे, मा. खा. ए टी नाना पाटील, किशोर काळकर, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, रोहीत निकम, पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, जिल्हा उपाध्यक्षा नुतनताई पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, गोविंद शेलार, अमोल पाटील, श्रावण लिंडायत यांच्या सह विविध स्तरांतून त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम