ठाकरे गटाला निवडणूक जाणार सोपी ? भाजप घेणार माघार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।  अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भावनिक आवाहनानंतर भाजप आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.शिंदे गट व ठाकरे गट ज्या विधानसभेसाठी लढत आपले चिन्ह हि गोठविले होते, त्याच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला आता विजय मिळविणे सोपे झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा आपल्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली असून त्यामध्ये उमेदवारीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल की मागे घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम