मंत्री महाजनांनी माझे चॅलेंज स्वीकारावे : आ.खडसे !
बातमीदार | २७ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु असून यात आता कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरून एकमेकाच्या फोटोला जोडे मारू लागले आहे. त्यावर नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेवून थेट मंत्री गिरीश महाजन यांना नोटीस देणार असल्याची माहिती दिली आहे.
आपल्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी माझे चॅलेंज स्वीकारावे व त्यानुसार वेळ, तारीख कळवावी तसेच त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली असून त्यासाठी त्यांना वकिलांमार्फत एक रुपया अब्रूनुकसानीची नोटीस बजावल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री विरोधक असूनही त्यांनी एअरॲम्बुलन्स पाठविली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हृदय बंद पडले. काही सेंकदात शॉक देऊन हृदय सुरू केले. मरणाच्या दारातून आपण परत आलो. असे असताना महाजन यांच्याकडून आपल्या आजारपणावर शंका घेण्यात आली. आता रुग्णालयाचे प्रमाणपत्रच प्राप्त झाले आहे, त्यामुळे आजार खरा की खोटा हे सिद्ध झाले आहे, असे खडसे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम