शरद पवारांनी घेतला काम करण्याचा निर्धार !
बातमीदार | २७ नोव्हेबर २०२३
२६ नोव्हेंबर या दिवशी देशात संविधान अमलात आले. देश प्रगती करत असताना काही घटक देशात अराजकता निर्माण करत आहेत. अशावेळी जनतेने निराश न होता काम करण्याचा निर्धार केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नवी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन नेरूळ येथे केले होते. या वेळी २०० पेक्षा अधिक बचत गट आणि शेकडो महिलांची उपस्थिती मेळाव्याला लाभली होती. या मेळाव्याद्वारे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने नियोजित कार्यक्रमावर पाणी फिरले.
या वेळी महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ म्हणून स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहून नवचैतन्य निर्माण करतील, अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली. या वेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला अध्यक्षा सलुजा सुतार, जी. एस. पाटील, संदीप सुतार आदींनी मेहनत घेतली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम