दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियान कार्यशाळा ” महाविद्यालयात झाली.
या कार्यशाळेत प्रथम सत्रात मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. डॉ.सहदेव जाधव यांनी “पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता” या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ.चेतन महाजन यांनी जलश्री योजना व जलयुक्त शिवाराचे महत्त्व व वृक्ष लागवडीपासून त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृतीची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या प्रा. डॉ.एस.डी. भंगाळे यांनी प्लास्टिक चा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान याबाबत विचार मांडले. या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य ए.आर.राणे होते.
तर समारोप उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.अशोक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.नीलेश जोशी, प्रा.सारिका सोनवणे, प्रा. डॉ.पूनम जमधडे यांनी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम