मेगा रिचार्जचे काम अंतिम टप्प्यात ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ नोव्हेबर २०२३

देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व माजी मंत्री अर्चना चिटणीस यांच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते.

जळगाव, बुलडाणा जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शाहपूर या पट्ट्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या महत्त्वाकांक्षी मेगा रिचार्ज योजनेचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांनी सांगितले, की जगातील आश्चर्य ठरेल, अशी ही मेगा रिचार्ज योजना आहे. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आपण या योजनेसाठी हवाई सर्वेक्षण केले असून, योजना पूर्ण झाल्यावर उत्तर महाराष्ट्रासह बऱ्हाणपूर व शाहपूर पट्टा सुजलाम् सुफलाम् होईल. २०१८ मध्ये अर्चना चिटणीस पराभूत झाल्यावर आणि २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार गेल्यावर या योजनेसाठी पाठपुरावा कमी पडला. मात्र आता महाराष्ट्रात आपण पुन्हा सत्तेवर आलो असून, मध्य प्रदेशमध्येही भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास या योजना मंजुरीसाठी बळ मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम